न्यायालयाच्या आदेशानुसार जमादारांची तात्पुरती पदोन्नती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशास अनुसरून सेवा जेष्ठता यादीनुसार पोलीस आयुक्तालयातील 115 जमादार यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिकेवर अंतिम निर्णय त्याच्या आधीन राहून पदोन्नतीचे निर्देश देण्यात आले आहेत.

शासन निर्णयान्वये मुंबई उच्च न्यायालयात 4 ऑगस्ट 2017 रोजी दिलेल्या न्याय निर्णयान्वये पदोन्नतीचे आरक्षण अवैध ठरविण्यात आले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अद्याप स्थगिती दिलेली नाही. मारवाडी आहे त्यामुळे पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे 25 मे 2004 च्या शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार सेवा ज्येष्ठता यादीतील जमादारांना 7 ऑगस्ट रोजी पदोन्नती देण्यात आली आहे.

यामध्ये पोलीस आयुक्तालयाच्या विविध शाखा सह पोलीस ठाण्यातील 115 जमादारांचा समावेश आहे. शनिवारी या पदोन्नती बाबत असे आदेश पोलिस उपायुक्त मीना मकवाना यांनी जारी केले.

Leave a Comment