प्रभाग रचनेसाठी मनपाकडे उरले दहा दिवस; निवडणूक आयोगाने दिली डेडलाइन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबाद मनपाला राज्य निवडणूक आयोगाचे सोमवारी सुधारित आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आता 18 नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनपा प्रशासनाने अगोदरच अर्धे काम करून ठेवले आहे. उर्वरित अर्धे काम पुढील दहा दिवसांमध्ये प्रशासनाला करावे लागणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार मनपामध्ये 126 सदस्य संख्या राहील प्रभागांचे संख्या 42 असणार आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेतील सदस्य संख्या अगोदर 115 होती‌. अलीकडेच महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सदस्य संख्या आता 126 पर्यंत पोहोचली आहे. त्यादृष्टीने शहरात एकूण 42 प्रभाग तयार होतील. 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 एवढी गृहीत धरण्यात आली होती. त्यात लोकसंख्येचे नैसर्गिक वाढ गृहीत धरून मनपाला प्रभाग तयार करावे लागतील. 2011 मधील जनगणनेचे प्रगणक गट केंद्रबिंदू मानून प्रभाग तयार होतील. संबंधित प्रभागातील वाढीव लोकसंख्या दहा टक्के गृहीत धरले जाईल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

प्रभाग तयार करताना प्रशासनाला अत्यंत तारेवरची कसरत करावी लागणार आहे. एकही प्रगणक गट एका प्रभागातून दुसर्‍या प्रभागात केल्यास वादु पडू शकतो. 2019 मध्ये प्रगणक गटाचे वाद उफाळून आल्याने प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत शपथपत्र दाखल करणार नाही तोपर्यंत ही याचिका निकाली निघणार नाही.

Leave a Comment