Tennis : नदाल-जोकोविचला पराभूत करत 19 वर्षीय स्पॅनिश खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tennis : स्पेनच्या कार्लोस अल्काराझ नावाच्या 19 वर्षीय टेनिसपटूने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कार्लोसने जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोविचचा 6-7(5/7), 7-5, 7-6(7/5) असा पराभव करत माद्रिद ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जोकोविच वरील हा त्याचा पहिलाच विजय आहे. यानंतर एखाद्या नंबर 1 टेनिसपटूला पराभूत करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत त्याने राफेल नदालचाही पराभव केला होता. याबरोबरच, क्ले कोर्ट स्पर्धेत नदाल आणि जोकोविचवर सलग विजय मिळवणारा तो पहिलाच खेळाडू देखील ठरला.

तीनच दिवसांपूर्वी 19 वर्ष पूर्ण करणाऱ्या कार्लोसने 21 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या नदालला पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. क्ले कोर्टवर नदालला पराभूत करणारा तो पहिलाच किशोरवयीन खेळाडू ठरला. कार्लोसने 5 आठवड्यांत सलग दुसऱ्या एटीपी मास्टर्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. या मोसमात कार्लोसने टॉप-10 खेळाडूंविरुद्ध सात सामने जिंकले आहेत. अंतिम फेरीत आता त्याचा सामना गतविजेता अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होणार आहे. झ्वेरेव्हने दुसऱ्या उपांत्य फेरीत स्टेफानोस सित्सिपासचा सरळ सेटमध्ये पराभव केला. Tennis

जोकोविचला पहिल्यांदाच पराभूत केल्यानंतर कार्लोस म्हणाला की,” आता मी जगातील अव्वल टेनिसपटूंशी स्पर्धा करण्यास तयार आहे.” जोकोविचनेही कार्लोसचे जोरदार कौतुक करताना म्हंटले कि,” “त्याने दबाव चांगल्या प्रकारे हाताळला. या वयात खेळाडूने अशा धैर्याने खेळणे खरोखरच आश्चर्यकारक आहे. तो जिंकण्यास पात्र होता. ही खरोखरच जोरदार टक्कर होती.” Tennis