लिएंडर पेसची राजकारणात उडी; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस यांनी राजकारणात उडी घेतली असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे क्रिडा क्षेत्रात मैदान गाजवणारा लिंएडर पेस आता राजकारणात नवीन इंनिग सुरूवात करणार आहे.

लिअँडर पेस तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्याचे कळवण्यास आनंद होत आहे. मी खूप आनंदी आहे. तो माझा धाकटा भाऊ आहे. मी युवा मंत्री होते, तेव्हा तो लहान होता. तेव्हापासून मी त्याला ओळखते.” असे बॅनर्जी यांनी सांगितले.

कोण आहेत लिएंडर पेस-

लिएंडर पेस दिग्गज भारतीय टेनिसपटू असून त्यांनी क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार देखील 1996-97 मध्ये मिळाला आहे. 2001 मध्ये पद्म पुरस्कार आणि 2014 साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्याला सन्मानित केलं आहे. लिएंडर पेसने भारताकडून खेळताना 1996 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवला आहे.

Leave a Comment