दहावी-बारावीची परीक्षा महिन्यावर परंतु लसीकरण मात्र काठावर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्याचे आदेश शिक्षण मंडळाने जानेवारी महिन्यात दिले होते. परंतू, महिनाभरात केवळ 30 ते 35 टक्के विद्यार्थ्यांना लसीचा एकच डोस मिळाला आहे. अद्याप 70 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे. त्यामुळे परीक्षेपूर्वी म्हणजे एका महिन्यात सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.

शिक्षण मंडळातर्फे यंदा दहावीची परीक्षा 15 मार्चपासून तर बारावीची परीक्षा चार मार्चपासून सुरु होणार आहे. 14 आणि 25 फेब्रुवारीला दोन्ही वर्गाच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार आहेत. जिल्ह्यात नऊ फेब्रुवारीपर्यंत 2 लाख 64 हजार 511 विद्यार्थ्यांपैकी 74 हजार 686 विद्यार्थ्यांना पहिला डोस दिला आहे. परीक्षेपूर्वी या विद्यार्थ्यांना लसीचा दुसरा डोसही मिळण्याची शक्यता आहे. मात्र, उर्वरित 1 लाख 89 हजार 825 विद्यार्थ्यांना अजून पहिलाही डोस मिळालेला नाही.

15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण त्या-त्या शाळेतच केले जात आहे. परंतू, दर रविवारी शाळेला सुटी; तर शनिवार, रविवार आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सुटी असल्यामुळे लसीकरणाची गती मंदावली आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारीदेखील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरु ठेवावे. लसीकरण करत असताना नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांऐवजी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

2,64,511 – इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी
74,314 – दहावीचे एकूण विद्यार्थी
74,686 – पहिला डोस घेतलेले विद्यार्थी
30,356 – पहिला डोस घेतलेले विद्यार्थी
56,770 – बारावीचे एकूण विद्यार्थी
15,625 – लसीचा पहिला डोस घेतलेले विद्यार्थी

Leave a Comment