तेरा पानी रम्मी जुगार अड्डा पोलिस पथकाने केला उध्वस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

सांगलीतील कर्नाळरोडवर असणाऱ्या एका इमारतीच्या खोलीत सुरु असलेला तेरा पानी रम्मी जुगार अड्डा सांगली शहर पोलिसांच्या पथकाने उध्वस्त केला. पोलिसांनी या ठिकाणाहून २१ जणांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जितेंद्र किसन पळसे याच्या ऑफिस मध्ये हि कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ६० हजारांचे मोबाईल, ६ हजार ४०० रुपयांची पत्त्यांची पाने आणि रंगीबेरंगी क्वाईन, रोख ६५ हजार ६५५ रुपये असा एकूण १ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जितेंद्र पळसे याचे कर्नाळरोडवरील एका बिल्डिंग मध्ये ऑफिस आहे. या ऑफिस मध्ये २१ जण तेरा पाणी रम्मी जुगार खेळत बसले होते. पोलीस शिपाई विक्रांत माने यांना माहिती मिळाली कि याठिकाणी अवैधरित्या जुगार अड्डा सुरु आहे. माने यांनी याची माहिती शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना दिली. त्यांनी तातडीने एक पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

गुरुवारी सायंकाळी हे पथक त्या बिल्डिंग मध्ये गेले दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या पळसे याच्या कार्यालयावर छापा टाकला. यावेळी २१ जण त्याठिकाणी रम्मी जुगार खेळत असताना सापडले. त्याठिकाणी पत्त्यांची पाने, रंगीबेरंगी क्वाईन आणि मोठ्या प्रमाणात रोख रकम जप्त केली. रात्री उशिरा या २१ जणांना शहर पोलीस ठाण्यात आणून बेकायदेशीर तेरा पाणी जुगार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment