Term Insurance Policy | भारतातील महिला पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात खरेदी करतात Term Insurance ? जाणून घ्या कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Term Insurance Policy | भविष्याचा विचार करून आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे असते. पुरुष असो अथवा महिला असो त्यांना आर्थिक नियोजन करावेच लागते. परंतु हे आर्थिक नियोजन करताना आपल्या आरोग्य विमाकडे देखील लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. तुमच्या आर्थिक नियोजनात विमा खूप महत्त्वाचा असतो. आजकाल पुरुषांप्रमाणेच महिला देखील टर्म इन्शुरन्स (Term Insurance Policy) मोठ्या प्रमाणात घेत आहेत. आणि याबाबतची आकडेवारी देखील समोर आलेली आहे. अनेक अर्थतज्ञ आपल्या आर्थिक नियोजनात विम्याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगतात. नुकतेच एका अहवालात अशी माहिती समोर आलेली आहे की, पुरुषांपेक्षा महिला या टर्म इन्शुरन्स जास्त प्रमाणात खरेदी करतात त्याचा फायदा त्यांना भविष्यातील आर्थिक नियोजनात होतो.

टर्म इन्शुरन्स घेणाऱ्या लोकांची संख्या देखील आजकाल वाढत चाललेली आहे. अनेक महिला या विमा खरेदी करत असतात. आर्थिक नियोजनात इन्शुरन्स घेणे खूप गरजेचे आहे. जाती एखादी स्त्री घर सांभाळत असली, किंवा ऑफिसमध्ये जाऊन काम करत असली, तरी ती प्रत्येक वेळी कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात सहभाग घेत असते. आणि आर्थिक नियोजनातून योग्य अशा गोष्टींना प्राधान्य देऊन त्या गोष्टी करत असते. ज्या महिला त्यांच्या घरापासून दूर असतात. नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेलेल्या असतात. त्या महिला त्यांच्या कुटुंबाची खूप काळजी घेतात. त्यामुळे या महिला वर्गामध्ये टर्म इन्शुरन्स पॉलिसी (Term Insurance Policy) खरेदी करण्याची संख्या वाढत आहे. जवळपास टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यामध्ये 55 ते 60% हिस्सा महिलांचा आहे.

नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात विम्याची संबंधित ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या कंपनीने ही माहिती दिलेली आहे. गेल्या दोन वर्षात महिलांनी टर्म इन्शुरन्स खरेदी करण्याच्या संख्येत 80 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे स्त्रिया फक्त विम्या पुरता मर्यादित न राहता त्या अधिकचे कव्हरेज असलेल्या पॉलिसीची निवड करत आहेत. म्हणजेच त्यांच्या कुटुंबाचा जास्त विचार करत आहे. आर्थिक भविष्याचा विचार करून ते जास्त कव्हरेज घेत आहेत. यामध्ये दिल्लीमध्ये जवळपास 8 ते 10 टक्के महिलांनी टर्म इन्शुरन्स खरेदी केला आहे. हैदराबादमध्ये ही संख्या 6 ते 7 टक्क्यावर गेलेली आहे. बेंगलोरमध्ये 6 ते 7 टक्के महिलांनी टर्म इन्शुरन्स खरेदी केलेला आहे. मुंबईमध्ये 4.5 आणि गुंटूरमध्ये देखील 4.5 टक्के महिलांनी टर्म इन्शुरन्स खरेदी केलेला आहे. महिला टर्म इन्शुरन्स घेण्याससोबत जास्त कव्हरेज असलेली रक्कम निवडत आहेत.

आजकाल आपण पाहिले गेले तर, महिलांमध्ये अनेक आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यातही कर्करोगाच्या आजारात लक्षणीय पद्धतीने वाढत आहे. त्यामुळे विमा कंपन्या या त्यांच्या गंभीर आजाराच्या रायडरमध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचा देखील समावेश केलेला आहे. जेणेकरून महिलांना या टर्म इन्शुरन्स जास्त फायदा होईल. यामध्ये वार्षिक 36 हजार 500 रुपयांपर्यंत फायदे आहेत. त्याचप्रमाणे यात टेली, ओपीडी, मधुमेह, थायरॉईड लिपिड प्रोफाइल, कॅल्शियम आणि रक्त तपासणी यांसारख्या सुविधा देखील समावेश आहे.