शहराजवळ भीषण अपघात ! आई ठार तर मुलासह दोन चिमुकले गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – चारचाकीने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील वृद्ध महिला ठार, तर दुचाकी चालक व दोन बालके गंभीर जखमी झाले आहेत. शेंद्रा एमआयडीसी मुख्य रस्त्यावरील हर्मन कंपनीसमोर रविवारी रात्री आठ वाजता हा गंभीर अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकी सुमारे 60 फूट उंच उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेत कचराबाई जाधव (वय 60) यांचे उपचारापूर्वीच निधन झाले. तर अनिल जाधव (35), छकुली अनिल जाधव (12), तर बंटी अनिल जाधव (10, सर्व रा. नाथनगर, वडखा, ता.औरंगाबाद) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल जाधव हे आपल्या दुचाकीवरून (एमएच 20 डीडब्लू 3054) जालना महामार्गाकडे आई व मुलांसह जात होते. यावेळी हर्मन चौकात भरधाव चारचाकी वाहनाने (एमएच 20 एफपी 6878) दुचाकीस जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती की चारचाकीची एअरबॅग उघडली गेली व दुचाकी सुमारे 60 फुट उंचीवर जाऊन पुन्हा दुभाजकावर आदळली. यात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.

घटनेनंतर चारचाकी चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. रात्रीची वेळ असल्याने या ठिकाणी रहदारी कमी होती. काही प्रत्यक्षदर्शींनी थेट जखमींना रुग्णालयात पोहोचवले. दरम्यान, उपचारापुर्वीच कचराबाई यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. तर अनिल जाधव यांचे दोन्ही पाय निकामी झाले असुन दोन्ही मुलं गंभीर असल्याचे समजते.

Leave a Comment