न्यूझीलंडमध्ये दहशतवादी हल्ला: एका व्यक्तीने 6 जणांना केले जखमी, 3 गंभीर स्थितीत; पोलिसांकडून हल्लेखोर ठार

वेलिंग्टन । शुक्रवारी, न्यूझीलंडच्या ऑकलंडमधील काउंटडाउन सुपरमार्केटमध्ये एका हल्लेखोराने सहा जणांवर चाकूने वार केले आणि सहा जण जखमी झाले. पोलिसांनी हल्लेखोराला जागीच ठार केले. पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न म्हणाल्या की,” ही व्यक्ती इसिसच्या विचारधारेने प्रभावित होती.” ऑकलंडच्या न्यू लिन उपनगरात ही घटना घडली असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि रुग्णवाहिका दाखल झाली आहे. आर्डर्न म्हणाल्या की,” या हिंसक अतिरेक्याला पोलिसांनी घटनास्थळीच ठार मारले.”

पीएम आर्डर्न म्हणाल्या की,” आज जे काही घडले ते द्वेषाने भरलेले आहे. असे पुन्हा होऊ नये.” हल्लेखोर श्रीलंकेचा नागरिक असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की,”तो 2011 मध्ये न्यूझीलंडला आला होता. ही घटना दुपारी 2:40 वाजता घडली. अधिकाऱ्यांनी एका मिनिटात हल्लेखोराला ठार केले.”

हल्ल्याच्या 60 सेकंदात हल्लेखोराला ठार मारण्यात आले. त्याच्यावर इस्लामिक स्टेट मिलिटंट ग्रुपचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, न्यू लिन सुपर मार्केटमध्ये दुकानदार दिसून येतात, एका महिला त्याच्याकडे चाकू आहे असे सांगत असल्याचेही दिसून येते. तिकडे कोणीतरी आहे ज्याच्याकडे चाकू आहे. त्याने कोणावर तरी चाकूने हल्ला केला आहे. गार्डने लोकांना शॉपिंग मॉल त्वरीत रिकामे करण्यास सांगितले, त्यापूर्वी तेथे 6 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

3 जखमींची प्रकृती चिंताजनक आहे
सेंट जॉन्स एम्ब्युलन्स सर्व्हिसने रॉयटर्सला सांगितले की,” एकूण सहा लोकं जखमी झाले आहेत, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्याच वेळी, एक गंभीर आणि उर्वरित परिस्थिती नियंत्रणात आहे.” प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की,” त्यांनी मॉलच्या बाहेर चाकू मारल्यानंतर अनेक लोकांना जमिनीवर पडलेले पाहिले.” त्याचवेळी दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की,” त्याने गोळ्यांचा आवाज ऐकला.”

2019 मध्ये न्यूझीलंडमधील मशिदीवर अंदाधुंद गोळीबार
यापूर्वी मार्च 2019 मध्येही, न्यूझीलंडमधील अल-नूर आणि लिनवूड मशिदीमध्ये नमाजा दरम्यान लोकांवर अंधाधुंध गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात 51 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 8 भारतीयांचाही समावेश होता. या हल्ल्यानंतर 21 मिनिटांनी पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली.