पाकिस्तान हादरलं! कराची शेअर बाजारावर दहशतवादी हल्ला, २ ठार झाल्याची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराची । पाकिस्तानमधील कराची स्टॉक एक्सेंजवर दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त समोर येत आहे. जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवादी गोळीबार करत कराची स्टॉक एक्सेंजमध्ये घुसले असून २ लोकांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहे. जवळपास ४ दहशतवादी स्टॉक एक्सेंजच्या इमारतीत घुसले आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

कराची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “दहशतवाद्यांनी कराची स्टॉक एक्सेंजच्या मुख्य गेटवर ग्रेनेड हल्ला केला आणि नंतर गोळीबार करत इमारतीत घुसले. या दहशतवादी हल्ल्यात ४ दहशतवादी ठार करण्यात आलेल्या एक अजूनही इमारतीत लपला आहे.” दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात इमारतीच्या बाहेर सुरक्षेसाठी तैनात एक पोलीस अधिकारी आणि सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. स्टॉक एक्सेंजमध्ये ग्रेनेडचाही वापर करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर इमारतीत अडकलेल्या लोकांना मागील बाजूला असणाऱ्या दरवाजाने बाहेर काढलं जात आहे. “पाकिस्तान स्टॉक एक्स्जेंमध्ये दुर्देवी घटना घडली आहे,” असं ट्विट स्टॉक एक्स्चेंजचे संचालक आबिद अली हबीब यांनी केलं आहे. पार्किंगमधून मार्ग काढत ते घुसले आणि दिसणाऱ्या प्रत्येकावर गोळीबार केला असं त्यांनी सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment