पुलवामा पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर; दहशतवादी हल्ल्यात १ पोलीस शहीद तर १ जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर । काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाज नायकूला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. पण दुसरीकडे दहशतवाद्यांचे सुरक्षा दलांवर हल्लेही वाढले आहेत. पुलवामात सलग दुसऱ्या दिवशी जवानांवर हल्ला झाला आहे. पुलवामामध्ये सुरक्षा दलांच्या एका टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं सांगण्यात येतं आहे. यात एक पोलीस शहीद झाला. तर १ जण जखमी झाल्याचं सांगण्यात येतं आहे. यानंतर जवानांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुलवामातील प्रिचूमध्ये आज दुपारी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हा हल्ला करण्यात आला. यात जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन जवान जखमी झाले. यातील एक जवान शहीद झालाय. यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवली. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

पुलवामात आज सलग दुसऱ्या दिवशी सुरक्षा दलांवर हल्ला झाला आहे. श्रीनगरच्या बाहेरील परीसरात असाच हल्ला झाला. यात बीएसएफचे दोन जवान शहीद झाले. यानंतर दहशतवादी जवानांची शस्त्र हिसाकून पळाले. सुरक्षेसाठी तैनात असलेले हे दोन जवान दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी दिली.आजही जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या कारवाईत लोलाब येथील जंगलात सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना पकडलं. हे तिन्ही दहशतवादी लश्कर ए तोयबाशी संबंधित आहेत. तिघांकडून शस्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment