Elon Musk यांनी चीनी लोकांचे केले कौतुक, अमेरिकन लोकांना सांगितली ‘ही’ बाब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पुन्हा एकदा अमेरिका आणि चीन दरम्यान तणाव वाढला आहे. परंतु, Tesla आणि SpaceXचे CEO Elon Musk यांनी चीनी लोकांचे कौतुक केले आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत, Elon Musk यांनी चीनी लोकांबद्दल सांगितले की,’ ते स्मार्ट आणि मेहनती लोक आहेत. माझ्या मते चीन आश्चर्यकारक आहे. चिनी लोकांमध्ये खूप ऊर्जा आहे. तिथले लोक एंटाइटल्ड नाहीत तसेच ते कधीही आत्मसंतुष्ट होत नाहीत. ‘

खरं तर, Automotive Newsला दिलेल्या मुलाखतीत मस्क यांना विचारले गेले होते की, येत्या काही दिवसांत चीनमधील इलेक्ट्रिक वाहनांबाबत त्यांची रणनीती काय असेल. या प्रश्नाला उत्तर देताना मस्क म्हणाले की, चीनच्या तुलनेत लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क किंवा बे बे एरियामध्ये राहणारे लोक एंटाइटल्ड आहे आणि ते पूर्णपणे आत्मसंतुष्ट आहेत.

टेस्लाला चीनने मदत केली आहे
मस्क पुढे म्हणाले की,’ चिनी सरकारने काही प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे, परंतु तो अमेरिकेत नाही. टेस्ला अशा काही कार कंपन्यांपैकी एक आहे ज्यांना अमेरिकन सरकारकडून फारच कमी पाठिंबा मिळाला आहे. लक्षात ठेवा की गेल्या वर्षीच चीन सरकारने शांघाय येथील टेस्ला फॅक्टरीसाठी 1.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेण्यास मदत केली होती. यानंतर, कोरोना विषाणूच्या साथीनंतर, स्थानिक सरकारने तेथे उत्पादन पुन्हा सुरू करण्यास मदत केली. मस्क पुढे म्हणाले की,’ ते नेहमीच सपोर्टिव्ह होते. हे जरा विचित्रच आहे की ते एका नॉन-चीनी कंपनीला इतका सपोर्ट देतायत. पण तसे नाही.

कार सेल्सचा मार्गच बदलला
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकासाठी नुकतेच स्पेसएक्सच्या रॉकेटचे प्रक्षेपण करणार्‍या मस्कने कार विक्रीच्या भविष्याबद्दल सांगितले, थेट ग्राहकांना मोटारी चीविक्री करणे आणि ती ऑनलाइन विकणे हे आता नॉर्मल होईल. डीलरशिप आणि स्टोअरचे युग आता बदलणार आहेत. मस्कने उत्तर दिले, ‘पारंपारिक डीलरच्या परिस्थितीत … मला वाटते की ते निरुपयोगी आहे आणि सध्याच्या साथीने हे लक्षात घेण्यास भाग पाडले आहे.’

ग्राहक आणि गुंतवणूकदारांना खूष ठेवण्यासाठी प्रचंड उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत त्यांनी सल्ला दिला की, जगभरातील कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाच्या मार्केटिंग प्रेजेंटेशनवर कमी लक्ष दिले पाहिजे. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या उत्पादनाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment