बेरोजगारांसाठी गुड न्यूज! आता डिग्रीशिवाय मिळणार Tesla मध्ये काम करण्याची संधी; 10,000 रिक्त जागा भरण्याची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : कोणत्याही नोकरीसाठी उमेदवाराला घेताना सर्वप्रथम उमेदवाराने कोणती डिग्री पूर्ण केली आहे याचा विचार केला जातो. मात्र आता tesla मध्ये डिग्री शिवाय काम करण्याची संधी मिळणार आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 10,000 रिक्त जागा भरण्याची घोषणा tesla चे सीईओ एलन मस्क यांनी केली आहे.

विशेष म्हणजे कॉलेज डिग्री शिवाय नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याबाबतची माहिती एलन मस्क यांनी आपल्या ट्वीटर अकाउंट द्वारे दिली आहे. ऑस्टिन येथे तयार होत असणाऱ्या टेसला या मनुफॅक्चरिंग प्लांट मध्ये 2022 पर्यंत दहा हजारांहून अधिक लोकांना काम देण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

याकरिता विद्यार्थ्यांना कॉलेज डिग्री ची आवश्यकता नसून विद्यार्थी हायस्कूल नंतर या प्लांट मध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात. एलन मस्क यांनी यापूर्वी जुलैमध्ये कंपनीचे कन्स्ट्रक्शन काम नवीन मॅन्युफॅक्चरिंग सुविधेसह वेगात सुरू असल्याची घोषणा केली होती.

ऑस्टिन अमेरिकन स्टेटमेंट च्या एका रिपोर्टनुसार जर टेसलाने 10,000 वर करणार रोजगार दिला तर कंपनीकडून आधी सांगण्यात आलेल्या वर्करच्या किमान संख्येच्या दुप्पट ही संख्या असेल. पूर्वी ही संख्या 5000 इतकी होती.

Leave a Comment