Tesla Electric Truck : Tesla ने लॉन्च केला Electric Truck; सिंगल चार्जवर 805 किमी धावणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एलोन मस्कची (Tesla Electric Truck) कंपनी टेस्लाने आपल्या पहिल्या हेवी ड्युटी ऑल-इलेक्ट्रिक सेमी ट्रकची डिलिव्हरी सुरू केली आहे. हा ट्रक रस्त्यावर चालणाऱ्या कोणत्याही डिझेल ट्रकपेक्षा 3 पट अधिक शक्तिशाली असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा इलेक्ट्रिक ट्रक 20 सेकंदात 0-60mph (97 किमी/तास) वेग गाठू शकतो. याशिवाय एकदा चार्ज केल्यानंतर हा इलेक्ट्रिक ट्रक तब्बल 805 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकतो.

Tesla Electric Truck

एलोन मस्क यांनी स्पार्क्स, (Tesla Electric Truck) नेवाडा येथील कंपनीच्या गिगाफॅक्टरी येथे आयोजित कार्यक्रमात सॉफ्ट-ड्रिंक कंपनी पेप्सीला पहिला ट्रक दिला. पेप्सीने डिसेंबर 2017 मध्ये 100 ट्रक ऑर्डर केले होते. खरं तर या इलेक्ट्रिक ट्रकची डिलिव्हरी 2019 मध्ये होणार होती, परंतु कोरोना महामारी आणि बॅटरी उत्पादन नसल्यामुळे विलंब झाला.

Tesla Electric Truck

20 सेकंदात 0 ते 60 mph वेग- (Tesla Electric Truck)

चालता फिरता अवस्थेत ट्र्क चार्जिंग करण्यासाठी यामध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंगसारखी वैशिष्ट्ये मिळतील. हा ट्र्क पूर्णपणे लोड केला तरीही तो अवघ्या 20 सेकंदात 0 ते 60 mph वेग वाढवू शकतो. कंपनीच्या दाव्यानुसार डिझेल (Tesla Electric Truck) ट्रकपेक्षा हा इलेक्ट्रिक ट्र्क जवळपास तिप्पट शक्तिशाली आहे.

Tesla Electric Truck

 

या ट्रकमध्ये युनिक (Tesla Electric Truck) सेंट्रल सीटिंग देण्यात आली आहे. दोन्ही बाजूला मोठ्या स्क्रीनसह, कपहोल्डर आणि वायरलेस फोन चार्जरसह उजवीकडे कन्सोल आहे. याशिवाय, कंपनीचा दावा आहे की अपघात झाल्यास, ऑल-इलेक्ट्रिक आर्किटेक्चर रिस्क आणि केबिन घुसखोरी दोन्ही कमी होते.