औरंगाबाद – टीईटी (TET) पेपर फुटी प्रकार संपूर्ण राज्य गजत आहे. या प्रकरणी जालना जिल्ह्यातील वाटुर येथे पुणे क्राईम ब्रँचने आज सकाळी छापे टाकले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे व तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीक याला पुणे क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केल्यानंतर टीईटी पेपर फुटी प्रकरणाचा हळूहळू उलगडा होत आहे.
याच टीईटी पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्रविण घुगे (रा. खैरी ता. पाथरी) व वाटूर येथील प्रा.सुनील कायंदे या दोघांची संभाषणाची याचा ऑडीयो पुणे सायबर पोलिसांच्या हाती लागला आहे. या संभाषणात संशिय प्रवीण घुगे याचा नातेवाईक वाटुर येथेल प्रा. सुनील कायंदे याचे नाव आल्याने आज सकाळी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यामधील वाटूर येथे पुणे सायबर पोलिसांनी छापा टाकला.
यावेळी प्रा.सुनील कायंदे याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. दरम्यान प्रा. सुनील कायंदे वाटूर येथे मिळून आला नाही. तसेच त्याचा घराच्या मंडळींना ही थांगपत्ता नसल्याचे समजते. दरम्यान पुणे क्राईम ब्रँच पोलिसांनी प्रा. सुनील कायंदे याच्या पत्नीसह वडिलांची चौकशी करत आहे.