वस्त्रोद्योगाला मिळणार वीज बिलात सबसिडी- ऊर्जामंत्री नितीन राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
वस्त्रोद्योगासाठी वीज बिलात सबसिडी देण्यासंदर्भात अहवाल तयार करून वस्त्रोद्योग विभागाकडून या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करून घेण्यासाठी ऊर्जा विभाग प्रयत्न करेल असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. विधानभवनातील समिती कक्षामध्ये सूतगिरण्या व यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. वस्त्रोद्योगाला वीजबिलात प्रति युनिट ३ रुपये सवलत मिळावी, इतर राज्यांप्रमाणे वस्त्रोद्योगासाठी वीज शुल्क १५ वर्षासाठी माफ करावे, सौर ऊर्जा धोरण वस्त्रोद्योगासाठी लागू करावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघांच्या पदाधिकाऱ्यांची, ऊर्जामंत्री राऊत यांच्यासोबत चर्चा झाली.

सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी आणि ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये जानेवारी व फेब्रुवारी २०१९ ची थकीत वीजबिलाची सवलत येत्या महिन्याच्या बिलात वळती करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली. याप्रसंगी मंत्री राऊत यांनी राज्यात विकासाचा समतोल राखण्याची सरकारची भूमिका आहे. उद्योगांना राज्यात आकर्षित करण्यासाठी वीजदर माफक असले पाहिजे असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment