ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केला ‘इतका’ निधी मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकरी व बाधितांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली गेली. दरम्यान आज बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून एकूण 365 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही मदत तत्काळ बाधीतांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागानी दक्षता घावी, अशा सूचना दिल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्विट द्वारे माहिती दिली असून त्यात राज्यातील विविध जिल्ह्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. तर काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या घरांच्या आणि मालमत्तेचेही अतोनात नुकसान झाले होते. नुकसानीकरिता बाधितांना मदतीचे वाटप विभागांनुसार केले जाणार आहे.

त्या विभागांमध्ये पुणे विभागासाठी 150 कोटी 12 लाख रुपये, कोकण विभागासाठी 8 कोटी 51 लाख रुपये, अमरावती विभागासाठी 118 कोटी 41 लाख रुपये, नाशिक विभागासाठी 1 लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी 77 कोटी 97 लाख रुपये, नागपूर विभागासाठी 10 कोटी 65 लाख रुपये याप्रमाणे एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

Leave a Comment