Monday, January 30, 2023

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; 18 ते 45 वयोगटातील लोकांचं होणार मोफत लसीकरण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने सर्वसामान्य लोकांची चिंता वाढवली असतानाच आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्य सरकार कडून राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

महाराष्ट्र सरकार सर्व नागरिकांना विनाशुल्क लसीकरण करेल असं ट्विट मंत्री नवाब मलिक यांनी केले.सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल. जागतिक टेंडर मागवण्यात येणार असून जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे असे नवाब मलिक यांनी म्हंटल.

- Advertisement -

मागच्या कॅबिनेटमध्ये  राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले

यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोफत लसीकरणा बाबत संकेत दिले होते. मोफत लसीकरणाचा राज्य सरकार चा विचार चालू आहे असं अजित पवार यांनी म्हंटल

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.