ठाकरे सरकारने शिवभोजन थाळीची मुदत वाढवली; १४ जूनपर्यंत मिळणार थाळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव वाढत आहे. अशात गीर गरिबांना चार घास मिळावेत म्हणून ठाकरे सरकारने राज्यात शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरवात केली आहे. या थाळीची मुदत आता वाढविण्यात आली असून ती १४ जूनपर्यंत दिली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून दिली.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रमाणामुळे लोकांनी घरातच राहणे योग्यतेचे ठरणारे आहे. राज्यात सुरु असलेल्या ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाज घटकांसाठी महिन्याच्या सुरवातीलाच मदतीचे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिलपासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळीअंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. ही मुदत पहिल्यांदा १५ मे पर्यंत वाढविण्यात आली होती. त्यामध्ये अजून महिनाभर हि मुदत वाढविण्यात आली असून १४ जून पर्यंत योजनेअंतर्गत मोफत जेवण दिले जाणार आहे.

राज्य सरकारने शिवभोजनाची व्यवस्था केल्यामुळे आज हजारो गरिबांना चार घास मोफत खाता येत आहेत. त्यांची मोठ्या प्रमाणात उपासमार होत नाही. राज्यातील गरिबांना सुरवातीला पाच रुपयांना हि शिवभोजनाची थाळी दिली जात होती. ती आता मोफत दिली जात आहे. एकीकडे कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे आता या काळात घरातच सुरक्षित राहण्याची विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

Leave a Comment