Saturday, March 25, 2023

टेंडर फिस्कटले, कमिशनही बुडाले म्हणून ठाकरे सरकारनं कुभांड रचले : प्रवीण दरेकरांचा टोला

- Advertisement -

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : जे मंत्री किंवा महाविकास आघाडीचे नेते रेमडेसिवीरसंदर्भात भाजपाच्या बाबतीत साप साप करत भुई थोपटत होते. त्यांचं थोबाड फुटलेलं आहे,  रेमडेसिवीर टेंडर फिस्कटले, कमिशनही बुडाले म्हणून ठाकरे सरकारनं कुभांड रचले, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनावरून विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

पण जेव्हा ही गोष्ट भाजपाच्या माध्यमातून होतेय हे समजताच त्यावेळी सरकारचा अहंकार जागा झाला. लोकांच्या जीवापेक्षा स्वत: अहंकारातच जास्त रस आहे. रेमडेसिवीर टेंडर काढून कोट्यवधीच्या कमिशनचं नुकसान होईल म्हणून कुभांड रचलं गेले. दुपारी मंत्री धमकी देतात आणि रात्री एका दहशतवाद्याला अटक करावी तसं कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतलं. जो राज्याला मदत करण्यासाठी आला त्यांना उचलल्यानंतर आम्ही त्याठिकाणी गेलो होतो. आता राजेंद्र शिंगणे यांनी जे सांगितलं त्यामुळे या सर्वांचा डाव उघड झाला, असा टोला प्रविण दरेकर यांनी सरकारला लगावला आहे.

प्रविण दरेकर म्हणाले की, डॉ. राजेंद्र शिंगणे या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित मंत्री होते. ब्रुक फार्मा कंपनीचे अधिकाऱ्यांनी FDA खात्याचे सचिव, अधिकारी यांना कल्पना दिली होती. रेमडेसिवीरचा साठा राज्य सरकारलाच मिळणार होता. शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत कंपनीने रेमडेसिवीरचा साठा राज्य सरकारला देणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर शिंगणे यांनी प्रामाणिकपणे परवानगीसाठी प्रयत्न केले असं त्यांनी सांगितले.