शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवशी ‘ही’ योजना लागू करत ठाकरे सरकार देणार ‘बर्थ-डे गिफ्ट’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष `शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी असतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य समजले जाणारे पवार यंदा वयाची ८० वर्ष पूर्ण करत आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवारांना श्रेय दिलं जातं. त्यामुळंच ठाकरे त्यांच्या नावानं ग्रामीण विकासासंबंधित एक योजना लागू करण्याच्या तयारीत आहे. शरद पवार यांच्या नावाने ‘शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना’ लागू करण्याच्या तयारीत असून यासंदर्भात लवकरच मंत्रिमंडळात निर्णय होण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांच्या नावे असलेली ही योजना देशपातळीवरील राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) या योजनेशी जोडण्यात येणार आहे. ही योजना लागू झाल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठे बदल घडून येणार आहेत. या योजनेचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भाग समृद्ध करणे हा आहे, असा दावा राज्य सरकार कडून करण्यात येत आहे. दरम्यान, या योजनेची अंतिम रुपरेखा राज्य सरकारने अद्याप निश्चित केली नसून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान,  फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील ‘मनोरा’ आमदार निवासाची पुनर्बांधणी करण्याचे काम केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ‘एनबीसीसी’ला देण्यात आले होते. तो निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता मनोरा निवासाच्या पुनर्बांधणीचे काम राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment