पर्यटकांसाठी खुशखबर! थायलंडने केली भारतीयांसाठी ‘फ्री विजा एन्ट्री’ जाहीर

thai
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पर्यटनासाठी परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. थायलंड सरकारने भारतीय पर्यटकांसाठी मे 2024 पर्यंत फ्री विजा एन्ट्री जाहीर केली आहे. ज्यामुळे भारतीय पर्यटकांना 10 नोव्हेंबर 2023 ते 10 मे 2024 पर्यंत थायलंड देशाला व्हिसाशिवाय भेट देता येणार आहे. खास म्हणजे, या निर्णयानंतर भारतीय कंपन्यांनी थायलंडला जाण्यासाठी खास विमान सेवा सुरू केल्या आहेत.

तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, दक्षिणपूर्व आशियाच्या मध्यभागी थायलंड देश वसलेला आहे. या देशांमध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त बौद्ध समुदाय राहतो. त्यामुळे थायलंडमध्ये सर्वात जास्त बौद्ध मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. थायलंडचे सौंदर्य तेथील संस्कृती आणि तेथील वातावरणवरील हे पाहण्यासाठी जगभरातून लोक थायलंडला विजिट देत असतात. याच थायलंड देशांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी तेथील सरकारने भारतीयांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश जाहीर केला आहे. यामुळे तब्बल 30 दिवस भारतीय थायलंडमध्ये राहू शकतात.

सध्या, एअर इंडिया, विस्तारा, इंडिगो आणि स्पाइसजेट अशा चार भारतीय विमान कंपन्या थायलंड येथे उड्डाण करत आहेत. तसेच, थायलंडच्या थाई एअरवेज, थाई लायन एअर, नोक एअर आणि थाई एअरएशिया या कंपन्या विमानसेवा देत आहेत. त्यामुळे या बातमीनंतर तुम्ही देखील थायलंडला जाण्याचा विचार करत असाल तर या विमानसेवांचा नक्की फायदा घ्या. आणि थायलंड सारख्या सुंदर आणि प्रसिद्ध देशाला भेट द्या.