दुर्दैवी ! धुळवड खेळून आलेल्या तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

बदलापूर : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात एक मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये धुळवडीला रंग खेळून घरी गेल्यानंतर एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आशुतोष संसारे असे या मृत तरुणाचे नाव असून तो बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरातील एका गृहसंकुलात राहत होता. मृत आशुतोष संसारे याचे अवघ्या वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं, मात्र संसार फुलण्याआधीच रंग उडाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे आशुतोष संसारे यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकं काय घडलं?
धुळवडीला रंग खेळून घरी गेल्यानंतर एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरातील एका गृहसंकुलात आशुतोष संसारे हा तरुण राहत होता. धुळवडीनिमित्त आशुतोष त्याच्या संकुलात रंग खेळून, नाचून घरी गेला. त्यावेळी त्याच्या छातीत अचानक दुखू लागले. यानंतर त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला.

संसार फुलण्याआधीच कोमेजला
आशुतोष संसारे याचे अवघ्या वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. त्यामुळे संसार फुलण्यापूर्वीच आशुतोषवर काळाने घाला घातल्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आशुतोषचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने कि त्याच्या मागे आणखी काही कारण आहे का? हे तपासण्यासाठी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं असून त्याच्या अहवालानंतर आशुतोषच्या मृत्यूमागे कारण स्पष्ट होणार आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.