डोंबिवली : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यात डोंबिवली शहरात दोघां भावांनी एका बिल्डरला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. बांधकाम व्यावसायिकला मारहाण करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. साफसफाई करताना सिमेंटचे पत्र हटवण्यावरुन बिल्डरचा दोघा भावांशी वाद झाला होता. आमच्या जागेवरील पत्रे तुम्ही कसे हटवता, याचा जाब विचारत दोघांनी बिल्डरला मारहाण मारहाण केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
डोंबिवली पूर्वेकडील गोळवली परिसरात दिनकर हाईट्स ही तीन मजली इमारत आहे. घटनेच्या वेळी इमारतीचे मालक आणि बांधकाम व्यावसायिक आशिष गव्हाणे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत इमारत परिसरातील जागेवर साफसफाई करत होते.
साफ सफाई करण्याच्या वादातून दोघा भावांची बिल्डरला मारहाण pic.twitter.com/eCvnxhBw6Q
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) March 4, 2022
पत्रे हटवण्यावरुन झाला वाद
या जागेवर असलेले काही सिमेंटचे पत्रे हटवताना याच परिसरात राहणाऱ्या निलेश गायकर नावाच्या व्यक्तीने हा पत्रा आमचा आहे, जागा आमची आहे, तू पत्रे का हटवतोस, असे सांगितले. यावरून आशिष आणि निलेश यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर निलेश गायकर आणि त्याचा भाऊ अमित गायकर यांनी बांधकाम व्यावसायिक आशिष गव्हाणेला मारहाण करण्यास सुरूवात केली. यानंतर आशिष गव्हाणे यांनी मानपाडा पोलिसांत दोघां भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.