पोरीवरून नडले, सिग्नलवर भिडले ! कल्याणच्या सिग्नलवर दोघा तरुणांमध्ये जोरदार राडा

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये एक विचित्र प्रकार घडला. यामध्ये एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून दोघा तरुणांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. हा वाद इतक्या विकोपाला गेला, की कार चालकाने गाडीसमोर उभे राहून भांडणाऱ्या दुसऱ्या तरुणाला गाडीसोबत फरफटत नेले. कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात हि घटना घडली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात रेड सिग्नल लागला होता. वाहन चालक सिग्नल ग्रीन होण्याच्या प्रतिक्षेत असताना एक बाईकस्वार व्यक्ती एका कार समोर उभा राहिला आणि त्याने कारवर मारायला सुरूवात केली. यानंतर एका तरुणाने त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू शकतो, या संशयातून हि संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.

कारसोबत फरफटत नेलं
त्या ठिकाणचा सिग्नल ग्रीन होताच कार चालकाने समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला चक्क काही अंतरावर फरफटत नेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यानंतर वाहतूक पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे कार चालकाला शोधून काढून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण चौधरी असे या आरोपी कारचालकाचे नाव आहे.

प्रेमसंबंधांचा संशय
प्रवीणचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय त्रिवेशला आला. नवी मुंबई येथे राहणारा प्रवीण हा या तरुणीला भेटण्यासाठी कल्याणमध्ये आल्याचा संशय त्रिवेशला आला. म्हणून त्याने आधारवाडी चौकात त्रिवेशला अडवून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी प्रवीण विरोधात कारवाई केली आहे. मात्र शहर पोलिस यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.