Thane Metro 4 : ठाणे शहरातील लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. वडाळा ते ठाणे-कासारवडवली आणि पुढे गायमुखपर्यंत धावणाऱ्या मेट्रो 4 व मेट्रो 4A मार्गिकांवरील मेट्रो लवकरच धावणार असून, यामुळे मुंबई आणि ठाणे यातील दळणवळण आणखी वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक होणार आहे. या प्रकल्पात एकूण 32 स्थानकांचा समावेश आहे, ज्यात ठाणेतील अनेक महत्त्वाची ठिकाणं जोडली (Thane Metro 4) जाणार आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि वाढता प्रवासी भार लक्षात घेता, मेट्रो 4 (वडाळा ते कासारवडवली) आणि मेट्रो 4A (कासारवडवली ते गायमुख) मार्गिकेवर लवकरच मेट्रो सेवा सुरू होणार आहे. सध्या कॅडबरी जंक्शन ते गायमुख या 10.5 किमी लांबीच्या मार्गावर ऑगस्ट 2025 पासून चाचणी फेऱ्यांना सुरुवात होणार असून, डिसेंबर अखेरीस या मार्गावरील सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
मेट्रो 4 ही एकूण 32.32 किमी लांबीची असून ती वडाळा ते कासारवडवली अशी धावेल, तर मेट्रो 4A ही 2.7 किमी लांबीची असून कासारवडवली ते गायमुख दरम्यान चालेल. प्रशासनाच्या माहितीनुसार, कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा टप्पा सर्वप्रथम सुरू होईल, त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण मार्ग कार्यान्वित केला जाईल. मेट्रोच्या या मार्गामुळे ठाणे आणि मुंबईतील दैनंदिन प्रवास अधिक सुलभ (Thane Metro 4) होणार आहे.
या मेट्रो मार्गात खालील प्रमुख ३० स्थानकांचा समावेश आहे:
- भक्तीपार्क
- वडाळा टीटी
- अनिक नगर बस डेपो
- सिद्धार्थ कॉलनी
- गरोडिया नगर
- पंतनगर
- लक्ष्मीनगर
- श्रेयस सिनेमा
- गोदरेज कंपनी
- विक्रोळी
- सूर्यानगर
- गांधीनगर
- नेव्हल हाऊसिंग
- भांडुप महापालिका
- भांडुप मेट्रो
- शांग्रीला
- सोनापूर
- फायर स्टेशन
- मुलुंड नाका
- तीन हात नाका (ठाणे)
- आरटीओ ठाणे
- महापालिका मार्ग
- कॅडबरी जंक्शन
- माजिवडा
- कापूरबावडी
- मानपाडा
- टिकूजी-नि-वाडी
- डोंगरीपाडा
- विजय गार्डन
- कासारवडवली
ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा प्रवास वेळ, इंधन आणि पैशांची बचत करणारा ठरेल. तसेच, वाहनांच्या गर्दीतून मिळणारी सुटका हा या मेट्रो प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा ठरणार आहे. मेट्रोमुळे शहरातल्या वाहतुकीचा चेहरामोहराच बदलणार आहे.




