Thane To Boravali Travel | केवळ 12 मिनिटात कापणार ठाणे ते बोरिवली अंतर; बनणार देशातील सर्वात लांब भुयारी मार्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Thane To Boravali Travel | सध्या महाराष्ट्रात अनेक मोठे मोठे प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने रस्त्याचे प्रकल्प आणि मेट्रो प्रकल्प मोठ्या प्रमाणात चालू आहेत. यात रेल्वे प्रकल्प आणि त्यावर उभारण्यात आलेले टनेल प्रोजेक्ट हा एक तंत्रज्ञानाचा नवीन प्रकार उदयास येणार आहे. यामध्ये अनेक शहरांमधील अंतर आता कमी होणार आहे. अशातच आता ठाणे ते बोरवली या टनेल प्रोजेक्टचे काम देखील सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन पार झालेले आहे. आणि या प्रकल्पासाठी 16600 कोटी रुपये पायाभरणी देखील झालेली आहे.

ठाणे ते बोरवली (Thane To Boravali Travel) या टनेल प्रोजेक्टचे काम पूर्ण झाल्यावर याचा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे. तो म्हणजे हे अंतर कापण्यासाठी एक ते सव्वा तास एवढा कालावधी लागायचा. परंतु हे अंतराचा केवळ बारा मिनिटातच पूर्ण करता येणार आहे.

हाय एक महत्वपूर्ण टनेल असणार आहे. तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे. या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बोरवलीच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि ठाणे घोडबंदर रोड यांच्या दरम्यान थेट संपर्क व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची लांबी 11.8 किलोमीटर एवढी आहे. त्यामध्ये ठाणे ते बोरवली यामधील अंतर खूप कमी होणार आहे. आणि केवळ बारा मिनिटातच हा प्रवास होणार आहे. या प्रकल्पामध्ये 10.25 km लांबीच्या बोगद्याची उभारणी देखील केली जाणार आहे.

ठाणे ते बोरवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची वैशिष्ट्ये | Thane To Boravali Travel

  • हा बोगदा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा असणार आहे.
  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधता अबाधित ठेवणारा हा मार्ग असणार आहे.
  • सिग्नल रहित तुम्हाला न थांबता प्रवास करता येणार आहे.
  • त्यामुळे ठाणे ते बोरवली हे अंतर तुम्हाला खूप कमी वेळेत पार करता येणार आहे.
  • जवळपास एक लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.