हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| छत्रपती शिवाजी महाराज यांना देशातच नव्हे तर जगभरात मानाचे स्थान आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळख असणाऱ्या शिवरायांप्रती प्रेम आणि आदर सर्वांच्याच मनात आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलेल्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधले आहेत.
शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड येथील आळंदीमध्ये जाऊन संत कृतज्ञता कार्यक्रमात सहभाग नोंदवला. त्यावेळी संत, महात्म्यांकडून त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज, बाबा महाराज, भास्करगिरी महाराज असे अनेकजण उपस्थित होते.
या सर्वांनी देवेंद्र फडणवीस यांना जिरेटोप घालण्याचा आग्रह केला. परंतु फडणवीस आम्ही नम्रपणे यास नकार दिला. पुढे , त्यांनी या घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केला. तसेच, “जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच! रयतेच्या राज्याच्या निर्मितीसाठी या मावळ्याला महाराजांचा आशीर्वादच पुरेसा आहे,” असे म्हणले.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1875237150360530972?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1875237150360530972%7Ctwgr%5Ef2cfd3da37020a9c46e3746cd745f81be87af1a0%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या कृतीमुळे त्यांचे महाराष्ट्रात कौतुक केले जात आहे. तसेच, सोशल मीडियावर देखील शिवप्रेमींकडून त्यांच्या या कृतीबाबत प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर, फडणवीस यांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला वायरल झाला आहे.