औरंगाबाद : मागील दीड वर्षांपासून लॉकडऊन लावल्यामुळे तरुणांचा कल मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन गेमिंग कडे वळला आहे. अशातच ऑनलाईन ॲप मध्ये गुंतवणूक केलेले अडीच लाखांची रक्कम गेल्यानंतर आई वडील रागवले म्हणून 17 वर्षीय मुलाने चिठ्ठी लिहून सोडल्याची घटना बुधवारी एन-4 या भागात उघडकीस आली आहे. त्यानंतर गुरुवारी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बारावीचे शिक्षण घेणाऱ्या एका युवकाला संगणकीय ज्ञान चांगल्या पद्धतीने असल्याने तो मागील काही दिवसापासून ऑनलाईन ऍप मध्ये गुंतवणूक करीत गेला. दरम्यान, वडिलांच्या खात्यातून ही रक्कम गेली. हा प्रकार आई-वडिलांना समजल्यानंतर बुधवारी रात्री त्यांनी रोहितला जाब विचारला.
तेव्हा त्याने मी असे काही केले नाही असे उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर सर्वजण जेवण करून आपापल्या खोलीत झोपी गेले. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित घरात दिसत नसल्याने आई-वडिलांनी त्याचा शेजारी मित्राकडे आणि नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र तो कुठेही दिसला नाही. मला माफ करा अशी भावनिक चिठ्ठी लिहून रोहित घर सोडून गेल्याची घटना समोर आली.