80 वर्षांचे हे आजोबा खातात चक्क दगडाचे खडे; रोज कडाडून फोडतात पावशेर खडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जगावेगळे काही तरी करायचे म्हणून अनेक जण कोणत्या ना कोणत्या कारणातुन चर्चेत असतात.तर काही जण आपल्या अंगवळणी पडलेल्या छंदापायी चर्चेत असतात… असाच एक प्रकार साताऱ्यातील फलटण तालुक्यातल्या आदर्की खुर्द गावातला आहे या गावातील 80 वर्षाचे आजोबा त्यांच्या अनोख्या सवयीमुळे सध्या चर्चेत आहेत ती सवय ऐकुन तुम्ही थक्क व्हाल. हे बाबा रोज नित्यनियमाने पावशेर दगडाचे खडे खातात.

रामभाऊ बोडके असे त्यांचे नाव आहे गेली 31वर्षे खडे खाण्याची सवय त्यांच्या अंगवळणी पडली आहे.मुंबई येथे 1989 मध्ये माथाडीतुन निवृत्त झाल्यावर ते गावी आले आणि त्यांना पोटदुखीचा त्रास सुरु झाला या दरम्यान त्यांनी अनेक डाॅक्टरांकडे उपचार केले मात्र पोटदुखीचा त्रास थांबला नाही मात्र गावातीलच एका वृध्द महिलेने तीन दिवस माती, खडे खाण्याचा अजब सल्ला दिला आणि रामभाऊ यांची पोटदुखी थांबली. मात्र खडे खाण्याची सवय त्यांच्या अंगवळणी पडली गेल्या 31 वर्षा पासुन त्यांची नित्यनियमाची बनलीय.

रोज ते 250 ग्राम दगडाचे खडे कडाकड फोडुन खातात कॅल्शिअम मिळत असल्याने अनेक व्याधीतुन मुक्त झालॊ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.त्यांच्या खाण्याबाबत अनेक डाॅक्टरांनी खडे न खाण्याचे सांगुन देखील हे 80 वर्षाचे बाबा हे दगडाचे खडे हे गुळाचा खडा फोडुन खाल्ल्या सारखे खडे चावतात….

रामभाऊ बोडके यांच्या खडे खाण्याच्या सवयीमुळे त्यांचे आरोग्य उत्तम असल्याचे ते सांगतात.मात्र डाॅक्टरांनी अशा कोणत्याही गोष्टीला दुजोरा दिलेला नाही मात्र या सवयी मुळे आदर्की 80 वर्षाचे बाबा परिसरात चांगलेच चर्चेत आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment