औरंगाबाद : कोरोना महामारी मुळे गेल्या 2 वर्षापासून शाळा बंद ठेवण्यात आली आहे परंतु सर्वच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. यावर्षी आजपासून ऑनलाईन शाळा सुरु झाली आहे. ऑनलाईन क्लासेसला सुरुवात झाली आहे.
जून महिना सुरु झाला की जशी पावसाची ओढ लागते तशीच शाळा सुरु होण्याचे सुद्धा वेध विध्यार्थ्यांसोबत पालकांना आणि शिक्षकांना लागते. परंतु आता कोरोना महामारीमुळे मागील वर्षांपासून शाळेत विद्यार्थी आलेच नाही. परंतु कोरोना महामारीचा धोका लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण सुरु राहील. तसेच मंगळवार पासून शहरात शंभर टक्के तर ग्रामीण भागात 50 टक्के शिक्षक नियमित उपस्थित राहून या शाळेची सर्व नियमित कामे करतील आणि विद्यार्थ्यांच्या तासांचे नियोजन करत ऑनलाइन शिकवतील. असं डॉक्टर गोंदावले यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद, अनुदानित, विना अनुदानित, मनपा, नपा, स्वयंअर्थसहायईत अशा एकूण 4 हजार 376 शाळा आहेत. ऑनलाईन शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना शिक्षण विभागाने परिपत्र काढून दिले आहे. यावर्षीही विद्यार्थ्यांना पाठय पुस्तके, गणवेश मिळण्याची शक्यता कमी आहे.