हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आहे. येत्या 30 जून 2024 पासून या बँकेकडून व्यवहारात असलेली खाती बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे बँकेने ग्राहकांना आणि खातेधारकांना
अलर्ट जारी केला आहे. पंजाब नॅशनल बँक (Panjab National Bank) आता ज्यांच्या खात्यावर गेल्या तीन वर्षांपासून कोणतेही व्यवहार झालेले नाहीत आणि या खात्यांमध्ये शिल्लक रक्कम जमा नाही अशी खाती कायमची बंद करणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना व्यवहारात नसलेल्या खात्यांचे केवायसी करून घ्यावे अशा सूचना दिल्या होत्या. यासाठी बँकेने 30 जूनपर्यंत मुदत वाढवली आहे. परंतु ग्राहकांनी 30 जूनपर्यंत केवायसी केले नाही तर ही खाती बंद केली जातील. याबाबतची माहिती देत बँकेने म्हटले आहे की, सर्वात प्रथम ग्राहकांनी बचत खाते तपासावे. ज्या खात्यांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये कोणतेही व्यवहार झाले नाहीत. तसेच गेल्या तीन वर्षात या खात्यांवरील रक्कम शून्य आहे. अशी खाती बंद होतील.
खाते बंद करण्याचे कारण काय??
महत्त्वाचे म्हणजे, खाते बंद करण्यापूर्वी ग्राहकांना नोटीस पाठवण्यात येईल. ही नोटीस पाठवल्याच्या एक महिन्यानंतर त्या ग्राहकाचे बँक खाते बंद केले जाईल. परंतु ज्या ग्राहकांना बंद केलेली खाते पुन्हा ऍक्टिव्ह करायची असतील त्यांनी बँकेच्या शाखांना भेट द्यावे. दरम्यान, जी खाती अनेक वर्षांपासून वापरली जात नाहीत त्या खात्यांचा स्कॅमर गैरवापर करतात. त्यामुळे अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठीच पंजाब बँकेने हे मोठे पाऊल उचलले आहे.
बँकेच्या अधिसूचनेनुसार, ज्या खातेधारकांना पुन्हा आपले खाते सुरू करायचे असेल तर त्यांनी बँकेच्या शाखांना भेट द्यावी. तसेच केवायसी फॉर्म भरावा. या फॉर्मसह आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी. त्यानंतरच ग्राहकांचे खाते पुन्हा सक्रिय केले जाईल. लक्षात घ्या की पंजाब बँक डिमॅट खाती बंद करणार नाही. म्हणजेच या खात्यांना केवायसी चा नियम लागू नसेल.