कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत राहणार सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे  (ब्रेक द चेन) अन्वये सुधारीत लॉकडाऊन आदेश निर्गमित करण्यात आलेले असून त्यात कृषि हंगाम विचारात घेऊन कृषि संबधीत दुकाने आणि त्यांच्याशी संबधीत आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच, कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवडयातील सर्व दिवस सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले होते.

सद्यस्थितीत कृषि हंगामाची व्याप्ती व कालमर्यादा विचारात घेता बी-बियाणे व कृषिविषयक साहित्य खरेदीकरीता गर्दी होऊ नये व शासन निर्देशानुसार कोविड-19 प्रतिबंधक शिष्टाचाराचे पालन व्हावे म्हणून कृषि संबधीत दुकाने आणि त्यांच्याशी संबधीत आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी)  तसेच, कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवडयातील सर्व दिवस सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 वाजेऐवजी यापुढे सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 पर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. यापूर्वीच्या आदेशात नमूद केलेल्या इतर सर्व अटी व शर्ती कायम राहतील.

सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमजबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील असेही जिल्हा प्रशासनाने आदेशात नमुद केले आहे.