ज्ञानवापी मशीद प्रकरण : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने बोलवली तातडीची बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्ञानवापी मशिदीशी आणि सुल्तान मशिदीवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधित मुस्लिम पक्षकारांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडत आहे. दरम्यान, ज्ञानवापीचा सहें रिपोर्ट तयार करण्यासाठी चीफ कमिश्नर विशाल प्रताप सिंह यांच्या टीमला दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. तर थोड्याचवेळात मशिदी प्रकरणावर निकाल येणार असून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तातडीची बैठक बोलावली आहे.

ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षकारांकडून केला जात आहे. दरम्यान या सर्वेक्षणानंतर ज्या ठिकाणी हे शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे ते स्थान सील करण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यानंतर दाव्याबाबत आज सुनावणी पार पडत असून कोणत्याही वेळी याबाबत निर्णय दिला जाणार आहे. या दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने बोलावलेल्या बैठकीत दोन्ही मशिदींबाबतच्या वादावर चर्चा केली जात आहे.

आज होणाऱ्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारीणीच्या मिटिंगमध्ये नक्की काय निर्णय घेतला जाणार? कोर्टाच्या निर्णयानंतर काय घडणार? याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे मुस्लिम पक्षकारांनी मशिदीच्या सर्व्हेला विरोध करणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. त्यावर थोड्याच वेळात निकाल येणार आहे. तसेच वारणासी कोर्टाने निकाल देत ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेसाठी दोन दिवसांचा अवधी वाढून दिला आहे.

अजय कुमार मिश्रा यांना सर्वेक्षण समितीमधून हटवले

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावर आज वाराणसी कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी वाराणसी कोर्टाने कोर्ट कमिशनर अजय कुमार मिश्रा यांना सर्वेक्षण समितीमधून हटवले असून तर, इतर दोन कोर्ट कमिशरांना अहवाल सादर करण्यास आणखी दोन दिवसांची मुदत दिली आहे. कथित शिवलिंगाभोवती असलेले बांधकाम तोडण्याच्या याचिकेवर आता उद्या सुनावणी होणार आहे.

कोर्टात सुनावणीवेळी व्यक्त करण्यात आला ‘हा’ संशय?

ज्ञानवापी मशिदी संदर्भात आज वाराणासी कोर्टात सर्व्हे रिपोर्ट दाखल करण्याबाबत सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्ते सीता साहू, मीनू व्यास आणि रेखा पाठक यांनी कथित शिवलिंगच्या चारही बाजूला बनलेली भिंत हटवण्याची मागणी केली. शिवलिंगाच्या चारही बाजूची भिंत हटवण्यात यावी. कारण शिवलिंगाला सिमेंट आणि दगडांमध्ये गडप केला असावा, असा संशय या याचिकेत व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment