हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ईडीच्यावतीने पुन्हा कारवाईचा धडाका सुरु करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे एनसीबीच्यावतीने ड्रग्ज प्रकरणी छापेमारी करीत कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. दरम्यान आज अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये तब्बल 6 कोटी 4 लाख 20 हजार रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कांदिवली युनिटच्यावतीने आज मुंबईत धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ईनुसा गुडविन या परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वीही ड्रग्ज संदर्भात अनेक गुन्हे दाखल आहे.
दरम्यान, संबंधित आरोपीकडून मेथाक्वेलोन असे जप्त केलेल्या ड्रग्सचे नाव आहे. आज एनसीबीच्यावतीने मुंबईत सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीही अंमली पदार्थ विरोधी पथकाच्यावतीने कारवाई करण्यात अली होती. त्यानंतर आता पुन्हा मुंबईत आज मोठी कारवाई करण्यात आली आहे.