नेवासे : हॅलो महाराष्ट्र – नेवासे तालुक्यातील भेंडे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी फिर्यादी सोमनाथ तांबे याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी २४ तासांच्या आत १० जणांना गावठी पिस्तुलासह अटक केली आहे. या प्रकरणात आरोपी मित्राला वाचवण्यासाठी फिर्यादीच्याच मित्रांनी बनाव करून, हा हल्ला पूर्ववैमन्यस्यातून झाला असल्याचा बनाव करत दोघांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला. नेवासे न्यायालयाने या सर्व आरोपीना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शुभम विश्वनाथ गर्जे, स्वप्नील बाबासाहेब बोधक, अमोल राजेंद्र शेजवळ, अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे यांनी खुनाचा प्रयत्न केला आहे तर ओंकार राजेंद्र काकडे, प्रसाद शिवाजी दळवी, अक्षय संजय आपशेट यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी व राहण्यास मदत केली होती. शुभम किशोर जोशी याला गावठी पिस्तुलासह अटक करण्यात आली आहे.
काय घडले नेमकं
सोमनाथ तांबे याचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला अक्षय याचा विरोध होता. यामुळे अक्षयने तांबेवर गोळी झाडली. अक्षय चेमटे व अमोल शेजवळ या मित्रांना या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी शुभम गर्जे व स्वप्नील बोधक यांनी जखमी तांबेवर दबाव आणला. यामध्ये पूर्ववैमन्यस्यातून कुकाणे येथील पप्पू जावळे व गणेश पुंड यांचे नाव नेवासे पोलिसांसमोर संशयित आरोपी म्हणून घेण्यात आले. हा बनावट प्रकार पोलिसांनी उघड केला आहे.