गेंदा फूल गाण्यावर ‘या’ तरुण मुलीचे ठुमके पाहुन प्रेक्षक होतायत घायाळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडेच रॅपर बादशाह चाहत्यांसाठी आपले एक नवीन गाणे ‘गेंदा फूल’ घेऊन आलाआहे, ज्यात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज त्याच्यासोबत दिसली. लोकांना बादशहाचे हे गाणे इतके आवडले की रिलीजच्या वेळीच हे गाणे यूट्यूबमध्ये टॉप ट्रेंड बनले. आतापर्यंत, या गाण्याला YouTube वर १६ दशलक्षाहून अधिक व्युज मिळाले आहेत. गाण्यातली जॅकलिन फर्नांडिजच्या स्टाईलने सगळे नेटकरी वेडावून गेले आहेत.लोक या गाण्याला इतका एन्जॉय करीत आहेत की आता बरेच तरुणही गाण्याचे डान्स स्टेप्स फॉलो करत आपल्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत आहेत.

दरम्यान, यूट्यूबवर ‘गेंदा फूल’वर एका मुलीने केलेला डान्स जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी साडीमध्ये ‘गेंदा फूल’वर सुंदर डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ मोनामी घोष नावाच्या यूट्यूब चॅनेलवरून यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे,जो लोकांना खूप पसंत पडला आहे . व्हिडिओमध्ये मोनामी घोषचा जबरदस्त डान्स पाहून लोक तिच्याबद्दल वेडे होत आहेत.

मोनामीने हा व्हिडिओ ३१ मार्च रोजी अपलोड केला होता, जो आतापर्यंत २० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. कॉमेंट्सच्या माध्यमातूनही लोक मोनामीच्या डान्सचे सतत कौतुक करत आहेत. तथापि, मोनमीने डान्सचा व्हिडिओ शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. ती नेहमीच तिचे डान्स व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करत असते आणि तिचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल असतात.

Badshah - Genda Phool|| MONAMI GHOSH||MUSIC VIDEO COVER||BENGALI ACTRESS

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment