हातावर ‘जय शिवराय’ लिहून रिक्षाचालकाने संपविले जीवन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – काही दिवसांपासून शहर व परिसरात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अशातच हाताच्या पंजावर ‘जय शिवराय’, मी आत्महत्या करीत आहे. असा मजकूर लिहून रिक्षाचालकाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले ची घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास काल विटावा गावात उघडकीस आली. प्रल्हाद बळीराम पोळ (52) असे आत्महत्या करणाऱ्या रिक्षा चालकाचे नाव असून, आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

याविषयी अधिक माहिती अशी की, प्रल्हाद पोळ (रा. बनचिंचोली, ता. हदगाव, जि. नांदेड) हे आपली पत्नी लता व मुलगा यांच्या सोबत विटावा येथे रामभाऊ गव्हाणे यांच्या घरात किरायाने राहतात. वाळूज परिसरात रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत होते. अशातच महिन्याभरापूर्वी त्यांचे वडील बळीराम पोळ यांचे निधन झाल्याने, पत्नी लता ही मुलासह मूळ गावी गेली आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रल्हाद पोळ राहत्या घरी फोन केला नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच बालाजी सूर्यवंशी व लक्ष्मण डोळस यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने प्रल्हाद यांना बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, तिथे डॉक्टरांनी प्रल्हाद पोळ यांना मयत घोषित केले.

हाताच्या पंजावर लिहिले मजकूर –
महिन्याभरापासून पत्नी व मुलगा गावी गेल्याने प्रल्हाद घरी एकटेच होते. आत्महत्या करण्यापूर्वी प्रल्हाद यांनी हाताच्या पंजावर पेनाने ‘जय शिवराय’ मी आत्महत्या करीत आहे, असा मजकूर लिहिलेला आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश कासरले करीत आहेत.

Leave a Comment