विद्यापीठात घनवन प्रकल्पाला सुरुवात; 6 हजार झाडांची केली जाणार लागवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | वाढत्या शहरीकरणामुळे ‘सिमेंट’चे जंगल निर्माण होत आहे. हे थांबवण्यासाठी आणि विद्यापीठ परिसर हिरवागार राहण्यासाठी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात अर्धा एकर जागेमध्ये सहा हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे.

कमीत-कमी जागेत जास्तीत जास्त झाडांच्या लागवडीचा मियावाकी घनवन प्रकल्प हा
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून साकरण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते या वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली. ‘ईकोसत्त्व इन्व्हार्यमेंट सोल्यूशन्स’ या संस्थेचे सहकार्य यासाठी लाभले आहे. यावेळी प्र. कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, रासेयो संचालक डॉ. टी. आर. पाटील, नताशा झरीन, मिलिंद केळकर, आम्रपाली त्रिभुवन, सिध्दार्थ इंगळे, प्रेम राजपूत आदींची उपस्थिती होती.

या प्रकल्पांतर्गत विद्यापीठातील विश्रामगृह परिसरातील पीएच. डी. वसतिगृहाच्या जवळ असलेली अर्धा एकर जमीन घनवन प्रकल्पासाठी वापरण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत 60 विविध प्रकारची 6 हजार झाडे या जागेत लावण्यात येणार आहेत. येणाऱ्या दिवाळीपर्यंत हे वृक्षरोपण पूर्ण करण्यात येणार असून आता विद्यापीठ परिसर हा ‘ऑक्सिजन हब’ म्हणून ओळखला जाणार आहे. विद्यापीठ परिसर अधिकाधिक हिरवा आणि नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे कुलगुरू डॉ. येवले यावेळी म्हणाले.

Leave a Comment