सत्तेसाठी भाजप कुठलीही तडजोड करू शकतो; भाजप नेत्याचा घरचा आहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष कुठल्याही प्रकारची तडजोड करू शकतो अशा शब्दात टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भाजप मार्गदर्शक मंडळाचे सदस्य हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी आज केली.

शांता कुमार यांचं आत्मकथन असलेल्या ‘निज पथ का अविचल पंथी’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

एक काळ होता जेव्हा संघ प्रमुख भाजपच्या अंतर्गत राजकारणावर लक्ष ठेऊन असतं पण आज सगळं बदललं आहे. भाजप सिद्धांतशी तडजोड करू लागला आहे.आपल्या कर्तव्यपथ वरून भ्रष्ट झाला आहे. हे सगळं बघून आपल्याला चिंता वाटतं असल्याचे देखील त्यांनी बोलून दाखवले.

मोदींची त्यांनी भरभरून स्तुती केली. तसेच असा प्रधानमन्त्री आपल्याला मिळाला हे आपले भाग्य आहे अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पण भाजप मात्र आज बिघडला कधी – कधी तर असे वाटते की आमच्या स्वतःच्या हाताने बनवलेला भाजप पक्ष हाच आहे का ? कारण हे राजकारण आपल्याला मानवणार नाही. असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like