वडिलांच्या डोळ्यादेखत पोहताना नदीत बुडालेल्या मुलांचा मृतदेह सापडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंघोळीसाठी वडिलांसोबत आलेला अल्पवयीन मुलगा पोहताना बुडाला होता. मल्हारपेठ येथील विकास पंडित हे आपला मुलगा विश्वजित विकास पंडित (वय-14, मूळ रा. विटा) असे मुलाचे नांव आहे. पोहताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने विश्वजित नदीतून वाहून गेला. विश्वजित यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आढळून आला.

गुरूवारी मित्रांनी आरडाओरडा केल्यामुळे नदीकाठावर गेलेल्या विकास पंडित यांनी धावत येऊन नदीमध्ये उडी मारली. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हाताला लागला नाही. पाण्याचा वेग आणि दोघांमध्ये अंतर जास्त राहिल्याने तो पाण्यामध्ये बुडाला. पोहताना विकास यांना दम लागल्याने त्यांचे प्रयत्नही थांबले. त्यानंतर तेथे असलेल्या अन्य ग्रामस्थांनीही शोध घेतला. विश्वजित बुडाल्याची माहिती मित्रांनी गावात सांगितल्यावर तातडीने युवक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नदीमध्ये उतरून शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, विश्वजितचा मृतदेह सायंकाळपर्यंत मिळून आला नाही.गुरुवार व शुक्रवारी शोध घेतल्यानंतर शनिवारीही शोधकार्य सुरूच होते.

शनिवारी दुपारी बोटीच्या साह्याने शोध घेण्यात आला. मृतदेह शोधण्यासाठी निसरे गावासह परिसरातील ग्रामस्थांनी मोठी मदत केली. युवकांनी तीन दिवस नदीपात्रात उतरून विश्वजितचा शोध घेतला. शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास विश्वजितचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पोलिस कर्मचारी दाखल झाले. दरम्यान, मुलगा पाण्यात बुडाल्याचे समजताच मुलाच्या आईने घटनास्थळी धाव घेऊन हांबरडा फोडला. तिचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment