सासवडला दोन वर्षाच्या मुलाचा दफन मृतदेह बाहेर काढला कारण…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सासवड- झणझणे (ता. फलटण) येथील माळी बेंद नावाच्या शिवारात ट्रॅक्टरवरून पडून दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्याची लोणंद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली होती. परंतु, शवविच्छेदन न करताच दफन करण्यात आले होते. त्यामुळे दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला. फलटण नायब तहसीलदारांच्या समक्ष मृतदेह बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन करून पुन्हा दफन करण्यात आला.

मिळालेली माहिती अशी, माळी बंद नावाच्या शिवारात दि. 28 जानेवारी रोजी दुपारी ट्रॅक्टरवरून पडून रुद्र गणेश भुजबळ याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा मृत्यू झाला याबद्दल कोणाचीही तक्रार नसल्याने रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार देवेंद्र पाडवी तपास करत होते.

बिबी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप खताळ यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट, ग्रामपंचायत सदस्य अमोल रासकर, महेश अनपट, किरण जाधव, गणेश पवार, गणेश भुजबळ, हवालदार अविनाश नलवडे, नाना होले, पोलीस पाटील प्रसाद कुमठेकर, आदी माळी वेंद व सासवडचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment