औरंगाबादेत एका हॉटेलमध्ये आढळला कामगाराचा मृतदेह ; कोरोनाच्या संशयाने नागरिकांनी केले दुर्लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी l शहरातील सिडको, एन-६ येथील आविष्कार चौकातील एका हॉटेलमध्ये ३२ वर्षीय कामगार बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने सोमवारी रात्री एकच खळबळ उडाली. मात्र कोरोणाच्या भीतीने या रुग्णाकडे बराच वेळ कोणी फिरकल ही नाही.

प्रदीप गंगाधर पवार (वय-40) असे या कामगाराचे नाव आहे. आविष्कार चौकातील अशोक गायकवाड यांच्या हॉटेलमध्ये प्रदीप पवार हा कामगार गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेलमध्ये रहात होता. सोमवारी रात्री तो अचानक बेशुद्धावस्थेत आढळून आला. रात्री या भागात फिरणाऱ्या काही लोकांना हॉटेल अर्धवट उघडे दिसले. त्यावेळेस आत प्रदीप पवार हा बेशुध्द पडलेला दिसून आला. याविषयी माहिती मिळताच हॉटेल मालक अशोक गायकवाड हेही घटनास्थळी दाखल झाले. मात्र कोणी आत जाण्याचे धाडस करत नव्हते. कोरोनाच्या भीतीपोटी कोणीही त्याच्या जवळ जाण्यास तयार होत नव्हते. याविषयी सिडको पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ याठिकाणी धाव घेतली. रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास १०८ रुग्णवाहिका याठिकाणी दाखल झाली. यातील डॉक्टरांनी सदर कामगार मयत
असल्याचे सांगितले.

१०८ रुग्णवाहिकेतून कामगारास घाटीत नेण्यासनकार देण्यात आला. या बाबत पोलिसांनी मनपा आरोग्यविभागाला कळविले होते. कोरोनाची लागन असू शकते समजून पोलिसांसह नागरिकांनी देखील त्या मृतदेहाला हात लावला नाही. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर रुग्णवाहिका आली व त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या प्रकरणी सिडको एन-7 पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment