औरंगाबाद | आरापूर एका शिवारातील विहिरीत पोत्यात घातलेला मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह फुगुनवर येऊ नये म्हणून त्याला दगड बांधलेला होता. हा खुनाचा प्रकार असल्याने पोलिसांनी सांगितले आणि वेगाने तपास चक्रे फिरवली आहेत. दरम्यान, या मृतदेहांची ओळख ओळख पटली असून हा मृतदेह विकास रावसाहेब थोरात वय 25, (रा. कदीम टाकळी ता. गंगापूर जिल्हा औरंगाबाद} या तरुणाचे असल्याचे समोर आले आहेत.
विकास हा समृद्धी महामार्गाचे काम करत असलेल्या एल अँड टी कंपनीत कामावर होता. चार दिवसापासून तो बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका विहिरी प्रेत असलेले पोते तरंगत असल्याची माहिती शिल्लेगाव पोलिसांना मिळाली त्यावरून पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर हे कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
लोकांच्या मदतीने विहिरीतील प्रेत बाहेर काढून हा मृतदेह 25 वर्षे तरुणाचा असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याची ओळख पटविण्यात आली दौलताबाद पोलीस ठाण्यात विकास थोरात हा तरुण हरविल्याची नोंद होती. त्यावरून अधिक तपास करण्यात आला तेव्हा हा मृतदेह विकासचाच आहे हे समोर आले आहे.