एक पाय नसतानाही ‘तो’ खेळतो फुटबॉल; पहा ‘या’ चौथीतील मुलाचा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन | फुटबॉल खेळणं हे मुलांसाठी नवीन नाही. मात्र आश्चर्य एका गोष्टीच आहे. की इम्फाळ येथील चौथीच्या वर्गातील विद्यार्थी कुणाल श्रेष्ठ एकल पाय देऊन फुटबॉल खेळतो आहे. त्यामुळे या मुलाकडे पाहून आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. या मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

कुणालच्या आईने सांगितले की, “माझा मुलगा एका पायाशिवाय जन्मला होता. मी त्याला कधीच आपल्या मित्रांच्या तुलनेत वेगळा वाटू नये म्हणून वचन दिले होते. त्याचा कधीही कमी आदर दाखविला नाही. त्याने स्वत: सायकल चालविणे शिकले आहे.

मला फुटबॉल खेळायला आवडते. सुरुवातीला मला बॅलेन्सिंगमध्ये अडचणी आल्या, मी घाबरलो पण आता माझा आत्मविश्वास वाढला आहे. माझे मित्र माझे खूप सपोर्ट करतात. मला आशा आहे की मी लवकरच गोल करीन अस मत त्या विद्यार्थ्याने व्यक्त केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment