औरंगाबाद । वाळूज परिसरातून एका प्रेमी युगलाला एमआयडीसी पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे. एमआयडीसी वाळूज परिसरातील जोगेश्वरी भागात राहणारी एक पंधरा वर्षे वयाची मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार तिच्या पालकांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
त्यावेळी त्यांचाच किरायादार असणाऱ्या मुलावर त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यांनतर पोलीसांनी तांत्रिक तपास सुरु केला आणि त्यानंतर लातूर येथून या जोडप्यास पोलीसांनी अटक केली. या अल्पवयीन मुलीस मारुती साहेबराव चूनवडे राहणार जोगेश्वरी या मुलाने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते.तो मौत का कुवा मधील मोटर सायकल चालवण्याचे काम करत होता. ते दोघे घरातून फारार झाल्यावर त्या दोघांनी त्यांच्या नातेवाईकास देखील संपर्क केला.
नव्हता मात्र एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक तपास करीत या दोघांना मोठ्या शिताफीने पकडून आणले आहे. ही कारवाई एमआयडिसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गंभिरराव, सायबर सेलच्या पोलीस उपनिरीक्षक सचिता तांबे पोलीस, अमलदार संदीप धनेधर, विनोद परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.