लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला अटकेनंतर जामीन परंतु निलंबन कारवाई नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | सोमवारी मुंबई येथील अँटी करप्शन ब्युरो एसीबीच्या पथकाने आरटीओ कार्यालयात छापा मारला होता. यावेळी आरटीओच्या अधिकाऱ्याची एसीबीच्या पथकाकडून अटक करण्यात आली होती. परंतु अटक केल्यानंतर दोनच दिवसात हे अधिकारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.

या आरटीओ अधिकाऱ्याची मुंबई अँटी करप्शन ब्युरो एसीबीच्या पथकाने चौकशी केली होती.
नंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अधिकाऱ्याला आणि लाच देणार्‍या एकास अटक करण्यात आली होती. ही कारवाई 12 जुलैला करण्यात आली होती. आणि 13 जुलै ला या प्रकरणी जामीन मिळाला. आणि लगेच 14 जुलै रोजी हे अधिकारी आरटीओमध्ये कामावर रुजू झाले. त्यांना अजूनही निलंबित करण्यात आलेले नाही. कारण औरंगाबादचे आरटीओ त्यांच्या वरिष्ठाला म्हणजेच सरकारच्या परिवहन खात्याला त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र पाठवणार आहे. त्यानंतर परिवहन मंडळ त्यांच्यावर कारवाई करायचं का नाही हे ठरवणार आहे. आणि त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे.

मुंबई येथील अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) च्या पथकाने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) स्वप्निल माने आणि एका खासगी व्यक्तीची वेदांतनगर पोलिस ठाण्यात कसून चौकशी केली. ही चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई पथकाने या व्यक्तीला लाच घेताना अटक केली. नंतर पथकाने सहाय्यक आरटीओ स्वप्नील माने यांच्या केबिनमध्ये चौकशी केली आणि नंतर हे पथक माने आणि त्या खासगी व्यक्तीला वेदान्तनगर पोलिस ठाण्यात घेऊन गेले. ड्रायव्हिंग स्कूल मालकाने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली होती. यानंतर त्या दोघांनाही अटक करण्यात आली होती.

Leave a Comment