दारुच्या नशेत डोक्यात वीट घालून निर्घृण खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | तासगाव येथे जुन्या भांडणाचा राग आणि मोबाईल बघायला न दिल्याचे कारणातून सेंट्रींग काम करणार्‍या कामगाराने आपल्या सहकारी कामगाराचा दारुच्या नशेत डोक्यात वीट घालून खून केला. तासगाव कृषी विभागाच्या मागील बाजूस सुरू असलेल्या नवीन बेदाणा मार्केटच्या बिल्डींगमध्ये रात्री साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. सन्मुख कांबळे असे मयत तरुणाचे नाव असून दुर्गाप्पा जंगम असे संशयिताचे नाव आहे. जंगम याला घटनास्थळावरुन पोलिसांनी त्वरीत अटक केली आहे.

तासगाव येथे सांगली रस्त्यावर असणार्‍या तालुका कृषी विभागाच्या कार्यालयापाठीमागील जागेत नवीन बेदाणा मार्केटचे काम सुरू आहे. यासाठी कांबळे व जंगम यांच्यासह अन्य कामगार काम करत होते. कांबळे व जंगम या दोघांच्यात पंधरा दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरुन वादावादी झाली होती. यावेळी कांबळे याने जंगमला रक्त येईपर्यंत मारहाण केली होती. या भांडणाचा राग जंगम याच्या मनात होता. कांबळे याने काही दिवसांपूर्वी नवीन मोबाईल फोन घेतला होता.

शनिवारी दिवसभर या दोघांमध्ये धुसफूस सुरू होती. रात्री दहाच्या सुमारास जंगम याने कांबळेला तुझा नवीन मोबाईल मला बघायला दे, अशी मागणी केली. यावेळी कांबळे याने नकार दिला. यावेळी दोघेही मद्यपान करत बसले होते. यावेळी जंगम याने तुझ्यासारखे दहा मोबाईल आणू शकतो मी, असे सांगून कांबळे याच्या डोक्यात शेजारीच असलेली वीट घातली. यामध्ये कांबळे हा कानातून, नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून जागीच ठार झाला.

इतर महत्वाचे –

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेचे बोगस अर्ज देऊन मोठी फसवणूक…

विशाल पाटील यांनी ठोकला लोकसभेसाठी शड्डू…

सांगलीत जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांनी केली रंगांची मुक्त उधळण…

Leave a Comment