रेकॉर्डवरील गुन्हेगाराची डोळे फोडून निर्घृणपणे हत्या; प्रेत फेकले रस्त्याच्या कडेला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगाराचे दोन्ही डोळे फोडून निर्घृणपणे हत्या केल्या नंतर मारेकऱ्यांनी प्रेत रस्त्याच्या कडेला फेकल्याची धक्कादायक घटना आज सकाळी जळगाव महामार्गावर समोर आली.पोलिसांनी काही तासातच मायताची ओळख पटविली असून अबू बकर चाऊस वय-38 (रा.टाइम्स कॉलोनी, औरंगाबाद) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आज सकाळी काही नागरिक जळगाव रस्त्याने जात असताना नारेगावकडे जाण्यासाठी वळण रस्त्याच्या जवळ झुडुपांमध्ये रक्ताने माखलेला व्यक्ती निपचित पडलेल्या अवस्थेत दिसून आला या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना देताच पोलीस उप आयुक्त दीपक गिर्हे, साह्ययक आयुक्त सुरेश वानखेडे, पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे,गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके, नाना पटारे, राजेंद्र साळुंके आदींनी घटनस्थळी गाठले. घटनस्थळाची पाहणी केल्या नंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णलयात हलविण्यात आले.व मृतांची ओळख पटविण्यासाठी खबऱ्याना कामाला लावले होते.अवघ्या दोन तासात पोलिसांनी मृताची ओळख पटविली.मृत हा अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आले.मृत अबू बकर वर अनेक गुन्हे दाखल असून या पूर्वी तडीपार, एमपीडिए कायदा अंतर्गत त्यावर कारवाई देखील करण्यात आलेली असल्याचे समोर आले आहे. मृत अबू बकर असल्याचे कळताच पोलिसांनी देखील तपासाची दिशा ठरविली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दोन्ही डोळे फोडले, चेहऱ्यावर अनेक वार
मारेकऱ्यांनी मृत अबू बकर याचे धारदार वस्तूने निर्घृणपणे दोन्ही डोळे फोडले एवढ्यावरच समाधान न मानता अबू च्या चेहऱ्यावर अनेक वार करून चेहरा विद्रुप करण्यात आला शिवाय शरीराच्या इतर भागवार देखील अनेक जखमा आहेत. द्वेष भावना,चीड किंवा बदल घेण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली असावी व वाहनातून मृतदेह महामार्गावरील झुडुपात फेकण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांचे विविध पथक लागले कामाला
हत्या झाल्याचे कळताच गुन्हे शाखा, एमआयडीसी सिडको पोलीस, डीबी पथक असे पोलिसांचे विविध पथक मरेकरीचा शोध घेण्यासाठी काम करीत आहेत.काल रात्री अबू कोठे होता,कोणा सोबत होता. त्याचे कुणाशी वैर आहे का? याचा तपास पोलीस करीत असून घटनस्थळी सीसीटीव्ही नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने पोलीस पथकाकडून तपासणी सुरू आहे.

Leave a Comment