वॉचमनगिरी सोडून सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आज प्रति महिना कमावतो आहे लाखो रुपये !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | कारोना लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. पण हार न मानता काही तरुणांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. आणि थोड्याच कालावधीमध्ये व्यवसायांनी जम बसून, ते आज लाखो रुपयामध्ये कमावत आहेत. पुण्यातील रेवन शिंदे या तरुणाचीही अशीच काही कहाणी आहे. वाचमेन म्हणून हा तरुण काम करत होता. ही नोकरी गेल्यानंतर त्याने चहाचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायामध्ये फोनवर ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत गरमागरम चहा तो पाठवू लागला. जून 2020 मध्ये हा व्यवसाय सुरू केला होता. त्याला पहिल्याच महिन्यात 50 हजार रुपये नफा मिळाला. आज तो महिन्याला दोन लाख रुपये यामधून व्यवसाय करतो.

28 वर्षीय रेवण हा पुण्यातील रहिवासी आहे. त्यांने बारावीपर्यंत शिक्षण घेतले. 2014 मध्ये तो कामासाठी पुण्यात आला. त्याच्यासोबत त्याचे भाऊ-बहीणनही होते. पिंपरी-चिंचवड भागामध्ये लॉजिस्टिक कामात तो सुरक्षारक्षक म्हणून रुजू झाला. 2019 मध्ये त्याची कंपनी बंद पडल्यामुळे त्याला नोकरी सोडावी लागली. घरी स्नॅकचे छोटेसे दुकान असल्यामुळे त्याला चहा नाश्ता बनवण्याचा अनुभव होता. 15 मार्च रोजी त्यांनी एक दुकान भाड्याने घेतले आणि त्यामध्ये चहाची टपरी सुरू केली होती.

चहाची टपरी सुरू केल्यानंतर काही दिवसातच लॉकडाऊन सुरू झाले. अशा काळात त्याला दुकान बंद ठेवावे लागले. लॉकडाऊन उठल्यानंतर त्याने सुरुवातीला मोफत चहाची विक्री केली. ग्राहकांना चहाची आवडल्यानंतर ते चहाची सारखी मागणी करू लागले. त्यामुळे त्याचा बिझनेस वाढू लागला. रेवणने ग्राहकांना हव्या त्या ठिकाणी चहा पोहोच करण्यासाठी काही मुले कामाला ठेवली आहेत. तो चहा सोबत कॉफी आणि गरम दूधही घरपोच देऊ लागला. तो लहान कपासाठी 6 रुपये आणि मोठ्या कपासाठी 10 रुपये असे पैसे ठेवले आहेत. या व्यवसायामधून तो दर महिन्याला दोन लाखांचा व्यवसाय करतो. त्यामधून त्याला पन्नास हजारांचा दरमाही नफा होतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment